इझम्

प्रत्येक मनुष्याला जगामध्ये न्यायपूर्ण, सुखी व समाधानी वातावरण असावे असे वाटत असते. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, आपण दुःखी कष्टी असू नयेत अशी त्याची अपेक्षा असते. असा मनुष्य जर कृतीशील असेल तर तो आपल्या बुद्धीप्रमाणे, कुवतीनुसार असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. ह्या प्रयत्नाचे सामूहिक स्वरूप म्हणजे निरनिराळे इझम्स निर्माण होणे उदा. सोशलिझम्, कम्युनिझम्, कॅपिटॅलिझम्, सेक्युलॅरिझम् वगैरे. हे इझम्स मानणाऱ्यातील ज्यांची प्रखर बुद्धिमत्ता असते, ते या वादांची एक राजकीय प्रणाली निर्माण करतात आणि त्यायोगे समाजात न्यायाचे, समाधानाचे वातावरण निर्माण व्हावे असा प्रयत्न करतात. परंतु माझ्या मते ह्या सर्व प्रकियेत दोन महत्वाचे मुद्दे हरवले गेले आहेत. ते म्हणजे १) माणसाचे मन आणि २) माणूस स्वार्थीपणे, दुष्टपणे का वागतो ह्याचा शोध घेतला जात नाही.

त्यामुळे आपण जर गेल्या काही शेकडो वर्षांचा इतिहास अभ्यासला तर असे लक्षात येते याच कारणामुळे कदाचित सर्व इझम्स अयशस्वी झाले असावेत; मग तो रशियामधील साम्यवाद असो, युरोपमधील समाजवाद असो किंवा भारतातील समाजवाद आधारित धर्मनिरपेक्षता असो. आजपर्यंत आपण असे समजत होतो की भांडवलशाहीचे यशस्वी प्रतीक म्हणजे अमेरिका. जगातील बऱ्याच देशांनी हे अमेरिकन स्वप्न (dream) आपल्या देशांमध्ये राबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला कारण तेथील भांडवलदार हाच मार्ग बरोबर आहे हे बिंबवण्यात यशस्वी झाले होते. पण खरंच तसे आहे का?

सध्या अमेरिकेत चालू असलेल्या वांशिक दंगलींनी रौद्र स्वरूप धारण केले and it has exposed a dark underbelly of American Society. महत्वाची गोष्ट म्हणजे या अशा दंगली काही अमेरिकेत पहिल्यांदाच झालेल्या नाहीत. काही वर्षांपूर्वी जेव्हा पूर्व अमेरिकेत इलेक्ट्रिसिटी ग्रीडच्या प्रॉब्लेममुळे जेव्हा ब्लॅकआउट झाला तेव्हा सुद्धा न्यूयॉर्क शहरात प्रचंड लुटालूट झाली होती. समाजातील धुमसत्या रागाच्या या हिंसक प्रतिक्रिया होत्या आणि आहेत. अमेरिका हा एक सुपरपॉवर मानला गेलेला श्रीमंत आणि विकसित देश आणि म्हणून मग प्रश्न उद्भवतो की हा एवढा राग का?

अमेरिकेचे जे मूळ रहिवासी आहेत, म्हणजे गोरा रंग आणि निळे डोळे असलेले, यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला तर असे दिसून येते की त्यांचे शिक्षण तसे खूपच कमी. अठराव्या वर्षानंतर आपल्याला काहीही फॅमिली सपोर्ट मिळणार नाही त्यामुळे काम करण्याशिवाय पर्यायच नाही. परंतु शिक्षण कमी असल्यामुळे जरी Technology Revolution झाले तरी या लोकांना त्या नोकऱ्या फार कमी मिळाल्या. भारतीय आणि चिनी लोकांनी या क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे त्या लोकांकडे बाकी वरकड कामे करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लकच राहिला नाही. परंतु ही कामे मिळण्यातील मोठा अडथळा म्हणजे मेक्सिकोमधून आलेले रहिवासी कारण ते निम्म्या किंमतीत सुद्धा काम करायला तयार होते. त्यामुळे या मूळ अमेरिकन रहिवाशांची दोन्हीकडून गळचेपी झाली.

आफ्रिकेतून अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांना जवळजवळ अडीचशे वर्षे गुलाम म्हणून राबविण्यात आले. त्याचबरोबर धट्टे कट्टे गुलाम मिळवण्यासाठी त्या गुलामांच्या मालकांनी काही भयंकर प्रयोग केले. एखाद्या जनावरांचे प्रजनन (breeding) करतात तसे ह्या काळ्या लोकांचे करण्यात आले. त्यामुळे कदाचित काही जेनेटिक दोष ह्या काळ्या लोकांमध्ये संक्रमित झाले असावेत कारण त्यांच्या विचार पद्धतीत काही गडबड दिसून येते. आज प्रयोगानंतर असे दिसून आले आहे की त्यांची तर्कशुद्ध प्रश्न सोडवण्याची क्षमता कमी असते. जेव्हा न्यूयॉर्क मधील अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचे एक सर्वेक्षण 10-12 वर्षांपूर्वी केले गेले तेव्हा काही धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली. ह्या विभागात कृष्णवर्णीय फार अपवादाने नोकरीत होते. त्याचे कारण काहींनी शोधले तेव्हा जाणवले की त्यांच्या परीक्षेत मुद्दाम काही तार्किक (logical) प्रश्न टाकले जात होते की जे सोडवण्याची मानसिक क्षमता कृष्णवर्णीयांमध्ये नसते. याचाच अर्थ कायद्याने गुलामी संपून जरी शेकडो वर्षे झाली असली तरी मानसिकरीत्या त्यांना कायम कमीच लेखण्यात आले.

गेल्या काही वर्षात उद्योजक, उच्चशिक्षित नोकरदार वर्ग, मध्यमवर्गीय आणि त्यांच्या खालील वर्ग या सर्वांमधील आर्थिक दरी दिवसेंदिवस रुंदावतच चालली आहे. तुम्हाला आठवत नसेल पण 2011 च्या सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्क मध्ये “Occupy Wall Street” म्हणून एक चळवळ उभी राहिली होती. त्यावेळेस सुद्धा सर्व बेरोजगार व कमी उत्पन्न गटातील लोक रस्त्यावर उतरून ह्या भयानक आर्थिक दरी विषयी विरोध करत होते. त्यानंतर आज हा लढा Black Lives Matter ह्या झेंड्याखाली कुठेतरी डोकं वर काढतो.

त्यामुळे आता हा संघर्ष असणारे आणि नसणारे (have’s and have not’s) यांच्यातील होऊ लागला आहे. ह्या अशा पराकोटीच्या वांशिक आणि आर्थिक संघर्षामुळे जगातील इतर प्रणालींप्रमाणेच अमेरिकेतील भांडवलशाही धोक्यात आल्याची अथवा अयशस्वी होण्याची ही नांदी तर नाही ना? अशा शंका व्यक्त होऊ लागल्या आहेत.

मग यातून मार्ग काय? सगळ्याच प्रणाली जर अयशस्वी ठरल्या तर भविष्यात काय वाढून ठेवले असेल? अनाचार, अनागोंदी आणि हुकूमशाही?

हे जर टाळायचे असेल तर एका नवीन तत्वज्ञानाचा शोध लावावा लागेल जो व्यक्तीकडून समाजापर्यंत जाण्याचा मार्ग अनुसरेल; कारण जेवढया जास्त व्यक्ती आनंदी, त्या प्रमाणात समाज आनंदी होईल. आजपर्यंतच्या सर्व इझम्सनी समाजापासून सुरुवात करून व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला असे दिसते आणि त्यामुळे तर अयशस्वी झाले असतील का?

जगात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करायची असल्यास माणसाची वृत्ती बदलविणे हे महत्वाचे कार्य आहे; कारण चांगल्या समाजातूनच चांगला राज्यकर्ता निर्माण होऊ शकतो. लोकशाही यशस्वी करण्याची हीच एकमेव गुरुकिल्ली आहे.

यशवंत मराठे

yeshwant.marathe@gmail.com

#Capitalism #Communism #Socialism #Secularism #Black_Lives_Matter #America

(या लेखाचा इंग्रजी अनुवाद 2-3 दिवसांनी पोस्ट करण्यात येईल)

1 Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.