दूरदर्शन – A Nostalgia – भाग २

पुढील १० वर्षे – १९८२ ते १९९२

१९८२ च्या आशियाई गेम्सचा मुहूर्त साधून भारतामध्ये रंगीत टीव्हीचा उदय झाला. तत्कालीन मंत्री वसंत साठे यांनी रंगीत टीव्ही सेट्स वरील ड्युटी एकदम कमी करून टाकली. तेव्हा तर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांपैकी ८०% जण कलर टीव्ही घेऊन यायचे. विमानतळावरचा सीन बघण्यासारखा असायचा. सगळीकडे टीव्हीच टीव्ही.

आमच्या घरी जरी कलर टीव्ही आला तरी तो काही सगळ्यांकडे नव्हता. पण गंमत म्हणजे कलर टीव्ही भाड्याने देणारे बरेच दुकानदार होते. एखादा खास कार्यक्रम असेल तर लोक भाड्याने सेट घेऊन जायचे. आम्ही मित्रांनी सुद्धा १९८३ ची क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅच टीव्ही भाड्याने आणून एकत्र बघितली.

ह्या दहा वर्षात भारतात टीव्हीचा प्रसार खऱ्या अर्थाने होऊ लागला. याच दशकात अनेक मालिका अतिशय लोकप्रिय झाल्या आणि या दशकाला खऱ्या अर्थाने मालिकांचे पहिले दशक म्हणता येईल.

कौटुंबिक मालिका:

(१) हम लोग – १९८४, (२) रजनी – १९८५, (३) विक्रम बेताल – १९८५, (४) मालगुडी डेज – १९८६, (५) नुक्कड – १९८६, (६) बुनियाद – १९८७, (७) वागळे की दुनिया – १९८८, (८) उडान – १९८९, (९) तेनाली रामा १९९०

विनोदी मालिका:

(१) ये जो है जिंदगी – १९८४, (२) करमचंद – १९८५, (३) मुंगेरीलाल के हसीन सपने – १९८९, (४) मि. योगी – १९८९, (५) जबान संभाल के – १९९१, (६) फ्लॉप शो – १९९१, (७) देख भाई देख – १९९२, (८) सुपरहिट मुकाबला – १९९२

सामाजिक मालिका:

(१) भारत एक खोज – १९८८, (२) सुरभी – १९९०, (३) चाणक्य – १९९१

पौराणिक मालिका:

(१) रामायण – १९८७, (२) महाभारत – १९८८

या सगळ्याच मालिका इतक्या लोकप्रिय झाल्या की विचारता सोय नाही. त्यातील काम करणारे कलावंत त्यांच्या खऱ्या नावापेक्षा मालिकांमधील नावाने ओळखले जाऊ लागले. बसेरर राम, भागवंती, गुरु, हरी, हवेलीराम, लाजोजी ही नावे सर्वतोमुखी होऊ लागली. हम लोग मालिकेचे सूत्रधार किंवा निवेदक अशोक कुमार होते. त्यांची नक्कल आम्ही आमच्या खेळांमध्ये करायचो. पुढे जॉनी लिव्हर सुद्धा बरीच वर्षे ती नक्कल सादर करत असे. रामायण आणि महाभारत या मालिकांच्या लोकप्रियतेचा आता अंदाजच करता येणार नाही. रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत रस्त्यावर शुकशुकाट असायचा. अरुण गोविलवर रामाचा आणि नितीश भारद्वाजवर कृष्णाचा जो काही कायमचा छाप बसला की ते इतके लोकप्रिय होऊन देखील भविष्यात टिकून राहू शकले नाहीत. लोकांनी त्यांना दुसऱ्या कुठल्या भूमिकेत स्वीकारलंच नाही.

Many times I wonder why all these serials became so popular? The principal reason was people could relate to the characters, their happiness and sorrows. The common theme across all those stories was the background setting — which reflected everyday life’s struggles, failures and triumphs. These serials had an underlying positive message upholding tradition, moral values and strengthening the fabric of the Indian culture.

या मालिकांमधील कलाकारांप्रमाणेच त्या व्यक्तींना टीव्ही मुळे त्या काळी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे वीणा मिश्रा, विनोद दुआ, के के रैना, नरोत्तम पुरी, गीतांजली अय्यर, तजेसश्वर सिंग, कोमल जी बी सिंग, राजीव मेहरोत्रा, सुमीत टंडन, सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे.

साधारण १९९२ च्या आसपास सरकारने या क्षेत्रात खाजगी कंपन्यांना परवानगी द्यायचे ठरवले आणि मग झी टीव्ही, स्टार टीव्ही, सोनी वगैरे कंपन्यानी धुमधडाक्यात प्रवेश केला. मला आठवतंय की झी टीव्ही लाँचच्या वेळी कित्येक लोकांनी दूरदर्शनची थट्टा करणारे रुकावट के लिये खेद है असे बॅनर्स पण दाखवले.

Then later Cable TV brought about a home entertainment revolution. Doordarshan found itself struggling to compete with a network of privately owned quality entertainment channels powered by commercials and latest technology. Doordarshan made an effort to catch up but like most state owned efforts, soon became lacklustre in comparison to the glitz and glamour of Zee, Sony and Star.

तेव्हापासून मात्र हे जगच बदललं. टीव्हीने अतिक्रमण करून सगळ्या घरांचाच ताबा घेतला. सगळेच चॅनेल्स २४ तास चालूच. अक्षरशः हजारोंनी मालिका, काय बघाल आणि किती बघाल? आज मुंबईच्या कुठच्याही झोपडपट्टीच्या वरती काय दिसतं — डिश अँटेनांचे जाळं. गेल्या काही वर्षात तर इतका अतिरेक झालाय की विचारता सोय नाही. न्यूज चॅनेल्सच्या ब्रेकिंग न्यूजने तर वात आणलाय. नको नको झालंय. मी तर हल्ली जवळजवळ टीव्ही बघतच नाही.

पण आता ज्या पद्धतीने नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम आजच्या पिढीत लोकप्रिय होतायेत ते बघून असं वाटतं की टीव्ही क्षेत्रातील वाढ खुंटेल कदाचित; निदान शहरात तरी.

Change is the only permanent thing in life.

कालाय तस्मै नमः

यशवंत मराठे

#reminiscence #television #doordarshan

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.