बाबा

आज बाबा (सुरेश सखाराम मराठे) असते तर त्यांना ८० वर्षे पूर्ण झाली असती. त्यांची साठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली होती त्यामुळे सहस्त्रचंद्रदर्शन तर नक्कीच आणखीन धुमधडाक्यात केले असते. आता मागे वळून बघताना असं वाटतंय की कुठेतरी देवानेच आम्हाला त्यावेळी बुद्धी दिली असावी कारण त्याच्यापुढील दीड वर्षात फेब्रुवारी २००० मध्ये त्यांचे निधन झाले.

बाबांचा जन्म १० सप्टेंबर १९३८ साली धुळ्याला झाला. नंतर २-३ वर्षात ते त्यांच्या आईबरोबर कराचीला गेले असावेत. त्यांची मुंज पण कराचीतील ब्राह्मण सभेत झाली. फाळणीच्या वेळी अप्पासाहेबांनी (माझे आजोबा) सर्व कुटुंबाला मुंबईला पाठवले तेव्हापासून ते मुंबईकर झाले. सुरुवातीची ३-४ वर्षे गोरेगावला आणि मग १९५२ साली सिटीझन मध्ये. माहीमला आल्यावर बालमोहन शाळेत मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाले. माझ्या माहितीनुसार त्यांची बॅच ही बालमोहनची पहिली मॅट्रिक बॅच. नंतर पोदार कॉलेजला इंटर पर्यंत शिक्षण. फारुख इंजिनियर त्यांच्या वर्गात होता त्यावेळी. तो कसा लेडी किलर होता आणि त्याच्यामागे मुलींची कशी रांग लागायची हे बाबांच्या तोंडून ऐकण्यात मजा यायची. वयाच्या १९व्या वर्षी अप्पासाहेबांनी त्यांना शिक्षण सोडून व्यवसायात यायला सांगितलं कारण त्यांचा व्यवसाय वाढत होता आणि माणसं कमी होती. माझी आजी आजारी असल्यामुळे बाबांचे लग्न १९५९ साली वयाच्या २१व्या वर्षीच झाले; आणि माझी आई १८ वर्षाची. (आता कल्पनाच करवत नाही)

लग्न लवकर झाल्यामुळे बाबा गेले तेव्हा त्यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण होऊन गेली होती. माझ्या आठवणीत माझ्या आई वडिलांचे एकही भांडण झाले नाही. Absolutely great tuning. पण गंमत म्हणजे लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांना असं लक्षात आलं की जी आईची पत्रिका होती ती संपूर्णपणे चुकीची होती म्हणून त्यांनी सहजच नवीन पत्रिका बनवून ज्योतिष्याला दाखवली तेव्हा त्याचे म्हणणे पडले की तुमचे तुमच्या बायकोशी पटणे शक्यच नाही कारण खडाष्टक योग आहे. आमच्या सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली. तेव्हा मनात आलं की लग्न ठरवताना जर so called योग्य पत्रिका असती तर त्या दोघांचे लग्न झालेच नसते. पण विधात्याची इच्छा हे लग्न व्हावं अशीच होती, तेव्हा दुसरं काय होणार?

अप्पासाहेबांचे निधन झाले तेव्हा बाबांचे वय फक्त ३१ होते. नुकताच उभा केलेला मराठे उद्योग भवनाचा डोलारा, त्यावर असलेलं कर्ज, त्याचवेळी प्रिमियर आणि टेल्को या कंपन्यांकडून होणारे पेमेंट प्रॉब्लेम आणि काय काय असेल माहित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अप्पासाहेबांची एवढी towering personality होती की बाबा त्यांचा वारसा चालवू शकतील याचीच बऱ्याच लोकांना खात्री नसावी. परंतु तो वारसा त्यांनी नुसता सांभाळलाच नाही तर यशस्वीपणे पुढे चालवला. १९७१ साली त्यांनी ऑफसेट प्रिंटिंग मशिन्स उत्पादन करण्याच्या व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करायचे ठरवले आणि १९७४ साली प्रिमियर आणि टेल्कोचे काम पूर्ण बंद केले. तेव्हांपासून स्विफ्ट समूहाने जी मुहूर्तमेढ रोवली त्याचा पुढे वटवृक्ष झाला. देशभर आणि परदेशात जवळजवळ १०००० पेक्षा जास्त मशिन्स विकण्यात आली असून आज भारतात मुद्रण व्यवसायात कोणाला स्विफ्ट माहित नाही असे होणारच नाही. त्यांच्याच कालखंडात स्विफ्टची खूप मोठी फॅक्टरी नाशिक मध्ये उभी राहिली आणि तसेच उत्पादनाकरिता दोन foreign collaborations सुद्धा झाली. राजाभाऊ केळकर यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आणि आर्थिक डोलारा सांभाळण्याची जबाबदारी बाबांच्या खांद्यावर होती.

बाबा मनाने अतिशय संवेदनशील होते आणि कुठल्याही माणसाच्या कामाचा आपण आदर केला पाहिजे ही त्यांची कायमची शिकवण होती. माझ्या लहानपणी आमच्याकडे प्रभाकर शिरोडकर नावाचा ड्रायव्हर होता आणि त्याकाळी त्याला ड्रायव्हर याच नावाने संबोधले जायचे. मला बाबांनी सांगितले की त्याला त्याच्या नुसत्या नावानेच हाक मारायची नाही तर त्याला काका पण म्हणायचं. मी मोठा झाल्यावर प्रभाकरलाच अवघडल्यासारखं झालं आणि त्यानेच मला काका या शब्दाला काट मारायला भाग पाडलं. तसेच मी एकदा ऑफिस मधील प्यून वर चिडलो आणि त्याला म्हटलं की अरे तुला एवढी सुद्धा अक्कल कशी नाही? बाबा मला शांतपणे म्हणाले की त्याला जर अक्कल असती तर तो हे काम करायला इथे आलाच नसता.

माझे आणि वसंतचे त्यांच्याशी वडील मुलापेक्षा मित्रत्वाचे संबंध अधिक होते आणि आम्ही त्यांच्याशी वाटेल ते बोलायचो. एक गंमत आठवली, माझ्या लग्नाच्या १-२ वर्षे आधी असेल, आम्ही दोघे गाडीने ऑफिसला जात होतो, गाडी मी चालवत होतो. आता केटरिंग कॉलेजच्या बस स्टॉपवर साधारणपणे चांगल्या मुली दिसायच्या. मी तिथे बघत असताना माझ्या लक्षात आलं की बाबा ही तिथेच बघतायेत. मी हसत त्यांना म्हटलं, अहो तुम्ही काय बघताय? तर मोठ्याने हसून मला म्हणाले की होणाऱ्या सुनेच्या नजरेतून बघतोय.

बाबा अनेक संस्थांशी संलग्न होते; व्यावसायिक संस्थांमध्ये महाराष्ट्र चेंबर, Printing Manufacturing Association आणि सामाजिक संस्थांमध्ये ब्राह्मण सेवा मंडळ, श्रवण साधना, मराठे प्रतिष्ठान. या बऱ्याच संस्थांमध्ये ते पदाधिकारीच नाही तर अध्यक्ष देखील होते. ब्राह्मण सेवा मंडळाच्या वृद्धाश्रमाची कल्पना त्यांचीच होती. त्यांचे सामाजिक भान वाखाणण्याजोगे होते. त्यांनी किती लोकांना काय काय मदत केली हे मला सुद्धा पूर्णपणे ठाऊक नाही. म्हणतात ना की उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला पण कळू देऊ नये आणि ते अगदी तसेच जगले.

बाबा म्हणजे एकदम शांत व्यक्तिमत्व; मी तरी त्यांना कधीही खूप चिडलेले किंवा रागावलेले बघितल्याचे आठवत नाही, आणि स्वभाव अत्यंत मनमिळावू. त्यामुळे त्यांचा मित्र परिवार सुद्धा प्रचंड मोठा; सगळ्या स्तरात त्यांचे मित्र. ते खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते.

एवढ्या सगळी व्यवधाने सांभाळून सुद्धा त्यांचे घराकडे कधीही दुर्लक्ष झाले नाही. माझी बहीण स्मिता त्यांची खास लाडकी होती आणि तिला ते तिच्या लग्नानंतर जवळजवळ रोज फोन करायचे. लहानपणी सुद्धा त्यांनी तिचे खूप लाड केले. रात्री कितीही वाजले असले तरी स्मिताने पेस्ट्री मागितली तर आणायला बाहेर पडायचे. नातवांपैकी अमेय आणि प्रणव मुंबईत असल्याने त्यांच्याशी सगळ्यात जास्त संबंध आला आणि त्यांचे खऱ्या अर्थाने लाड पुरवले गेले. प्रणवला घेऊन Lands End ला जायचं, भेळ किंवा समोसे खायचे हा त्यांचा लाडका छंद.

He also had a great sense of humour. त्याचे एक उदाहरण: अदितीला एकदा बाबांनी विचारलं की अगं, माझ्या गळ्याकडची कातडी जरा जास्त लोंबते आहे का बघ. तिला काहीच कळेना हे आता काय? तर त्याची कहाणी अशी की प्रणवला घेऊन गेल्यानंतर हा कमीतकमी २ समोसे तरी खायचाच पण बाबांच्या गळ्याची कातडी ओढून सांगायचा की आबा, तुम्हाला शपथ आहे पण आईला एकच खाल्ला म्हणून सांगा. आम्हाला हसत हसत म्हणाले तुमच्या मुलाने ओढूनओढून माझी कातडी लोंबायला लागलीय असं वाटतंय.

त्यांच्या मनात खूप होतं की मराठे उद्योग भवनच्या वास्तूत एखाद्या कार कंपनीची डिलरशिप घेऊन स्वतःची कार शोरूम असावी पण ते काही शक्य झाले नाही. नंतर जेव्हा ऑटोबानला जागा भाड्याने देऊन स्कोडा कंपनीची कार शोरूम झाली तेव्हा असं वाटलं की त्यांना कुठेतरी बरं वाटलं असेल.

एप्रिल १९९९ मध्ये त्यांना Cancer detect झाला. त्याच्यानंतर ८ महिने ट्रीटमेंट घेऊन ते पूर्ण बरे झाले. २६ डिसेंबरला त्यांच्या लग्नाला ४० वर्षे झाली पण आम्ही संपूर्ण कुटुंब हॉटेल लीला मध्ये जेवायला गेलो होतो. त्यांना तिथलं atmosphere आणि जेवण इतकं आवडलं की मला म्हणाले की पुढच्या प्रत्येक २६ डिसेंबरला इथेच यायचं. मी म्हटलं, जरूर, का नाही. पण आपल्याला भविष्यात काय वाढून ठेवलंय हे कुठे माहित असतं?

Chemo Therapy मुळे त्यांची immunity कमी झाली होती आणि त्यात त्यांना दुर्दैवाने Hepatitis B ची लागण झाली आणि त्याचा जोर खूपच जास्त होता. आणि त्यानेच त्यांचा बळी घेतला. ५ फेब्रुवारीला सकाळी ९.३५ ला माझ्या आणि आईसमोर त्यांनी डोळे मिटले. आजही आठवले तरी थरथरायला होते. त्यांच्या अंतिम यात्रेच्या वेळी आमच्या सोसायटीत मुंगी शिरेल इतकीही जागा नव्हती. त्यांनी आयुष्यात किती माणसं जोडली होती ते त्या दिवशी कळलं. त्यांच्या वडीलांप्रमाणेच (अप्पासाहेब) त्यांचे निधन अकालीच झाले पण तरी देखील समाधानाने या जगाचा निरोप घेतला.

बाबांचं लग्न लवकर झाल्यामुळे आम्हां भावंडांत आणि त्यांच्यात अंतर तसे खूप कमी होतं. त्यामुळे आम्हांला त्यांचे मार्गदर्शन आणि सहवास जवळजवळ ४० वर्षे मिळाला. पण मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की वसंतची मुले ओम आणि सिया तसेच स्मिताची मुले मंदार आणि पूनम या नातवंडांना मात्र त्यांचा सहवास मात्र फार लाभला नाही.

आम्हा भावंडांना खरंच खूप अभिमान आहे की अशा सर्वगुणसंपन्न व्यक्तीची आम्ही मुलं आहोत.

आम्हा सर्व मराठे परिवाराकडून आजच्या या त्यांच्या ८०व्या जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन.

यशवंत मराठे

#personalities #father #baba #memories

15 Comments

 1. खूपच सुरेख शब्दांकन, यशवंत.

  सुरेशभाऊंचे उत्तम मार्गदर्शन आयुष्याच्या सुरूवातीला मिळाले ह्यात धन्यता वाटते.

  सुरेशभाऊंना विनम्र अभिनंदन.

  आनंद देशपांडे

  Like

 2. अकरा वर्षांहून अधिक काळ मराठे उद्योग भवन मधे त्यांच्याबरोबर काम करताना मालक-नोकर असा भेद कधीच जाणवला नाही. कधीकधी लोक मला विचारतात, तुम्ही एवढे शांत कसे? मला मनापासून अस वाटत की हा गुण त्यांच्याकडून मिळाला. अकरावर्षात फक्त एकदाच त्यांना नाराज झालेले (रागावलेले नव्हे) बघितले, तेही माझ्याच चुकीमुळे!

  सुरेश भाऊंच्या स्मृतीला त्यांच्या ऐशीव्या जन्म तिथीला विनम्र अभिवादन!

  Liked by 1 person

 3. Yashwant as I am reading your blog I am learning regarding some missing links . I have many fond memories of sureshbhau and your family. One thing I would like to share is he never enjoyed eating mango but he use to be very happy in serving mangos to others ie our annual amras puri lunch during season.
  He was very caring , loving and excellent host. Ideal son, husband, father , uncle, neighbour but great human being. Namaskar

  Like

 4. Suresh kaka was too great. If anybody asks me have you met God – I will say yes. Nbut in the form of Suresh kaka. He was loving type , great patience , beautiful send of humour !
  I learnt the great thing from him – He lives “ Leadership”. He loves People and he loves tasks too ! In “ leadership grid style “ it is said you must become 9,9 if you wish to become a great leader – kaka was in born “ Bap”. Dispute free husband , our loving kaka and a leader – having humanity ! Sashtang pranam to him and Kaku !!

  Like

 5. Dear Yashwant
  Very respectful tribute to my God Father SURESHBHAU on the day of his 80 the birth anniversary. No sooner I went through your blog my memories from 1972 flashed the days joining the Swifts till this date. I simply can’t forget those golden days. I have lots to say about our association but I will definitely write and present you.

  Like

  1. Ashok, please get in touch with me on phone no. 9689937557. After 15 years stay in Bangalore, for last 20 years I am in Pune.

   Like

 6. फारच छान लिहले आहेस. मला त्यांच्या कडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन .

  श्रीकांत भिडे

  Like

 7. लेख फारच चांगला आहे। वडिलांची शिकवण आचरून त्यांचा वारसा पुढे चालवत आहात त्याबद्दल अभिनंदन

  Like

 8. सुरेशभाऊंची आणी माझी एकदाच भेट झाली, मात्र वि. के. मराठे व वा.ग. मराठे यांचेकडून त्यांच्याबद्दलची खूप माहीती ऐकता आली तसेच तुमच्या मातोश्रीं कडूनही मराठे प्रतिष्ठान चे कार्य करताना बरेच अनुभव ऐकता आले. त्यांच्याशी बोलताना आईशी बोलतोय असच वाटतं, त्यांची प्रतिक्रिया मिळाली की भरुन पावल्याचा प्रत्यय येतो.
  असो, असेच उत्तमोत्तम लिखाण आपले हातून घडो हि प्रार्थना.

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.